Monday, September 01, 2025 11:26:39 AM

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटीलांची मुंबईकडे कूच , कसा असणार प्रवास ?

सणवाराच्या काळात आंदोलन नको, यासाठी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

manoj jarange patil  मनोज जरांगे पाटीलांची मुंबईकडे कूच  कसा असणार प्रवास
manoj jarange

राज्यभरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे मनोज जरांगे हे चर्चेत आले आहेत. आंदोलनासाठी मनोज जरांगे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. मात्र सणवाराच्या काळात आंदोलन नको, यासाठी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

सरकारने समजावूनदेखील जरांगे त्यांच्या मुंबईमध्ये येण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा आता मुंबईकडे निघणार आहे. त्यांच्या या मराठा वादळाचा पहिला मुक्काम जुन्नर शहरात असणार आहे. यादरम्याने  या दरम्यान मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आणि त्यातून उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतमालाचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा - Ganesh Visarjan 2025: मुंबईत गणेश विसर्जनावेळी जेलीफिश-स्टिंग रेचा धोका; स्वतःचे रक्षण कसे कराल? जाणून घ्या 

येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याची त्यांची तयारी होती. हजारो समर्थकांसह आंदोलन छेडण्याचा त्यांचा मनसुबा होता. परंतु न्यायालयाने गणेशोत्सव काळातील गर्दी, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या कारणास्तव हे आंदोलन मुंबईत होऊ देण्यास नकार दिला. आझाद मैदानाऐवजी सरकार या आंदोलनाला नवी मुंबईमध्ये परवानगी देऊ शकते असं न्यायालयानं म्हटलं आहे.  त्यामुळे जरांगेंच्या आरक्षण लढ्यात नवा पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा -  Lalbaughcha Raja 2025 : लालबागचा राजा मंडळाला बीएमसीची नोटीस ; 24 तासांचा अवधी अन्यथा... 

दरम्याने न्यायालयाच्या या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "आम्ही न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहोत, आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे, आम्हाला नक्की न्याय मिळेल, आमच्याकडेही वकील बांधवांची टीम आहे, ती न्यायालयात जाईल". 


सम्बन्धित सामग्री