Thursday, August 21, 2025 04:44:15 AM

मनसेची थेट जुईनगर एसबीआय बँकेला धडक; ट्रांजेक्शन पावत्या मराठीत करण्याची मागणी

सध्या महाराष्ट्र मराठी भाषा वाढताना पाहायला मिळत आहे. सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढताना दिसत आहे.

मनसेची थेट जुईनगर एसबीआय बँकेला धडक ट्रांजेक्शन पावत्या मराठीत करण्याची मागणी

मुंबई : सध्या महाराष्ट्र मराठी भाषा वाढताना पाहायला मिळत आहे. सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील सगळ्या दुकांना मराठी बोर्ड पाहिजे असंदेखील फरमान मनसेने काढलं होतं. आता प्रत्येक बँकेचे मराठी नाव असले पाहिजे असा पवित्रा मनसेने घेतला आहे. यावरून मनसेने जुईनगरच्या एसबीआय बँकेला भेट दिली आहे. ट्रांजेक्शन पावत्या मराठीत करण्याची मागणी यावेळी मनसैनिकांनी केली आहे. 

मराठी भाषेसाठी मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठीचा मुद्दा मनसेनं पुन्हा लावून धरला आहे. मनसेने जुईनगरमधील 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या शाखेला भेट दिली. यावेळी बँकेमधील ट्रांजेक्शनच्या पावत्या इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असल्याचं मनसैनिकांना आढळलं. यासंदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने जाब विचारण्यात आला. ट्रांजेक्शनच्या पावत्या मराठीमध्ये न झाल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा मनसेनं  दिला आहे. 

हेही वाचा : आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकरांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना; गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी काय म्हणाले?

गुढीपाडव्याला शिवतिर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केले होते. या भाषणात त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी मराठी भाषेचा सगळीकडे वापर होत आहे का? ते तपासण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले. तसेच बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जात आहे की नाही ते तपासा. जर बँंकेत मराठी भाषेचा वापर होत नसल तर आपल्या स्टाईलने मराठी भाषेचा वापर करायला लावा अशा कानपिचक्या त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिल्या. 

यावरूनच आज मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नवी मुंबईच मनसे मराठी भाषेसाठी आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जुईनगर एसबीआय बँकेला भेट दिली. तेव्हा ट्रांजेक्शन पावत्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत आढळल्या. त्यानंतर मनसेने बँकेच्या अधिकाऱ्यांना भेट दिली आणि ट्रांजेक्शन पावत्या मराठीत करण्याची मागणी केली. त्यामुळे आता मुंबईतील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


सम्बन्धित सामग्री