Monday, September 01, 2025 11:03:00 AM

फुकट्यांकडून रेल्वेला मालामाल लॉटरी; वर्षभरात पावणेपाच लाख फुकटे प्रवासी गजाआड

रेल्वे प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात विविध रेल्वे गाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या तिकिट तपासणीच्या विशेष मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी लागली आहे.

फुकट्यांकडून रेल्वेला मालामाल लॉटरी वर्षभरात पावणेपाच लाख फुकटे प्रवासी गजाआड

नागपूर: बेशिस्त आणि फुकट्या प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात विविध रेल्वे गाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या तिकिट तपासणीच्या विशेष मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी लागली आहे यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला तब्बल 28 कोटींपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. प्रवासासाठी तिकीट नसलेल्या किंवा चुकीच्या तिकीटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला. रेल्वेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली असल्याचं समजतंय. 

वर्षभरात 4.75 लाखांहून अधिक विनातिकिट प्रवासी पकडले गेले, त्यामध्ये अनेकजण जनरल डब्यांचे तिकीट घेऊन आरक्षित डब्यांमध्ये चढले होते. या प्रवाशांकडून 10 कोटी 28 लाख रुपयांचे तिकीट भाडे आणि 6 कोटी 88 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच, प्रवासासाठी तिकीट न घेतलेल्या प्रवाशांवर कडक कारवाई करत रेल्वेने मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला.

हेही वाचा: ताजमहालच्या मालकीवरून वादंग; वक्फ सुधारणा विधेयकामुळे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत तिकीटाशिवाय प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे आणि यामुळे प्रवाशांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागते. भविष्यातही अशा मोहिमा सुरू राहतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


सम्बन्धित सामग्री