रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील वहाळ घडशी वाडी येथे राहणाऱ्या एका महिलेनं आपल्याच मुलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलीची हत्या केलेल्या आरोपाखाली या महिलेला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन मुली असलेल्या या महिलेनं तिसऱ्यांदाही मुलगीच झाली यामुळे नाराज होतं हे कृत्य केल्याचे समोर आलं आहे. या घटनेमुळे आजही काही भागांमध्ये स्त्री जन्माबाबत उदासिनता असल्याचे चित्र स्पष्ट होते. शिवाय जन्मदात्या आईनेच लेकीचा जीव घ्यावा, हा क्रूरतेचा कळस असल्याचेही या प्रकरणी बोलले जात आहेत.
हेही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंचा निर्यण! 'या' चार बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; एकानं दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
काय आहे घटना
सत्र न्यायालय चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आज, 25 ऑगस्ट 2025 रोजी एक महिन्याच्या बालिकेच्या खूनप्रकरणी आरोपी माता शिल्पा प्रविण खापले हिला भा.द.वि कलम 302 या गुन्ह्याखाली दोषी धरून तिला आजन्म कारावास आणि 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपी तिच्या दोन लहान मुली, नवरा व सासू-सासरे यांच्यासोबत वहाळ, घडशीवाडी (ता. चिपळूण) येथे राहत होती. आरोपी शिल्पा हिला दोन्ही मुलीच होत्या. तिला तिसरा मुलगा व्हावा, अशी तीव्र इच्छा होती. परंतू मुलगीच झाल्यामुळे ती नाराज होती. 5 मार्च 2021 रोजी तिचे पती रत्नागिरी येथे गेलेले असताना दुपारच्या सुमारास तिने तिच्या एक महिन्याच्या मुलीस घरातील पाण्याने भरलेल्या बादलीत डोके खाली पाय वर अशा स्थितीत ठेवून तिचा खून केला. तसेच शेजारचे लोक गोळा झाल्यावर बेशुद्ध पडल्याचे नाटक करुन आपण काहीही केले नसल्याचे दर्शवले. सुरुवातीला सावर्डे पोलीस ठाणेच्या पोलिसांनी आस्कमिक मृत्यू नोंद करून चौकशी केली. परंतु गुन्ह्याची सर्व परिस्थीती व एकूण पार्श्वभूमी विचारात घेवून मुलीचा खूनच झाला असल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोलीस उपअधिक्षक यांनी सखोल तपास करुन आरोपी माता शिल्पा खापले हिनेच खून केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाल्याने तिच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले.
हेही वाचा : Manoj Jarange : मनोज जरांगेंचा एल्गार! सरकार उलथवण्याची भाषा; मुंबईत येण्याचा मार्ग ठरला...
याची सुनावणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांचेसमोर झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. अनुपमा ठाकुर यांनी आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्याकरता एकूण 15 साक्षीदार तपासले. अखेर सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी आरोपीस दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.