Monday, September 01, 2025 12:05:05 PM

खासदार संजय राऊतांनी घेतला नीलम गोऱ्हेंचा समाचार; काय म्हणाले राऊत?

राज्यात सध्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

खासदार संजय राऊतांनी घेतला नीलम गोऱ्हेंचा समाचार काय म्हणाले राऊत

मुंबई : राज्यात सध्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाला दोन मर्सिडिज दिल्या कि एक पद मिळतं असे वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. गोऱ्हेंच्या या वक्तव्यावर ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया .त आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नीलम गोऱ्हे विश्वासघातकी बाई

नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नीलम गोऱ्हे जाताना घाण करुन गेल्या. तसेच नीलम गोऱ्हे विश्वासघातकी बाई असल्याचे आरोप खासदार संजय राऊतांनी गोऱ्हेवर केला आहे. गोऱ्हे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात याची माहिती असल्याचे नीलम गोऱ्हेंच्या आरोपांवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर दिले आहे. एका पदासाठी ठाकरे 2 मर्सिडीज घेतात असा आरोप गोऱ्हेंनी केला होता. साहित्य संमेलनाने माफी मागण्याचेही राऊतांनी म्हटले आहे.

हेही वाचा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढणार?, नरेंद्राचार्य महाराजांबद्दल केले अपमानास्पद वक्तव्य

 

'ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठवाड्यात पैसे घेऊन तिकीटं दिली'

सध्या महाराष्ट्रात नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंवर केलेल्या आरोपावर राऊतांनीदेखील गोऱ्हेंचा समाचार घेतला आहे. यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठवाड्यात पैसे घेऊन तिकीटं दिली असल्याचे म्हणत संजय शिरसाटांनी संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ठाकरेंनी निष्ठावंतांना तिकीटं दिलं नाही असा घणाघात संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर केला आहे. शिवसेना प्रमुखांनी बनवलेली शिवसेना तुम्ही बुडवली असा टोलाही निलम गोऱ्हेंवरून शिरसाटांनी संजय राऊतांना लगावला आहे.


सम्बन्धित सामग्री