नागपूर : राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त नागपूर मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मेट्रो सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धावणार आहे. दरम्यान आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यामुळे नागपूरात जल्लोष पाहायला मिळत आहे.
नागपूरमधील वासुदेव नगर मेट्रो स्थानकाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या माधव नेत्रालय उद्घाटनाच्या कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी प्रवाशांना सुविधा व्हावी यासाठी ही सेवा लागू करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यामुळे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मेट्रो सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धावणार असून मेट्रोच्या फेऱ्या दर 8 मिनिटांनी असणार आहेत.
आज नागपूर मेट्रोच्या अँक्वा मार्गिकेवर दर 8 मिनिटांनी मेट्रो फेऱ्या होतील. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. वासुदेव नगर मेट्रो स्थानकाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या माधव नेत्रालय उद्घाटनाच्या कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी प्रवाशांना सुविधा व्हावी यासाठी ही सेवा लागू करण्यात आली आहे.
हेही वाचा : Gudi Padwa 2025: राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह; मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा कसा असेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढी पाडव्याला नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. नागपूर येथे मोदी विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत. तसेच मोदी-मोहन भागवत एकाच मंचावर येणार आहेत. पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त नागपूर पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांसह 4 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या करणास्तव भाजपकडून स्वागताची तयारी करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा असल्याने भाजपकडून 47 चौकामध्ये शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू झाली होती. मात्र आता सुरक्षा व्यवस्थेच्या कारणामुळे त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे.