Wednesday, August 20, 2025 04:30:24 AM

Nanded Umri Tehsildar Suspended: तहसीलदाराला खुर्चीवर बसून गाणंं पडलं महागात; नेमकं घडलं काय?

रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी निरोप समारंभात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं गायल्याने त्यांना महागात पडले आहे. तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे.

nanded umri tehsildar suspended तहसीलदाराला खुर्चीवर बसून गाणंं पडलं महागात नेमकं घडलं काय

नांदेड: रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी निरोप समारंभात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं गायल्याने त्यांना महागात पडले आहे. नांदेड जिल्ह्यातून हा प्रकार समोर आला आहे. समाज माध्यमावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या अहवालानुसार विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित केलं आहे. या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे. 

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केल्याने राज्यात शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याची ही पहिली घटना समोर आली आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेडमधील उमरी तहसील कार्यालयात प्रशांत थोरात हे तहसीलदार पदावर कार्यरत होते. त्यांची बदली झाल्याने 8 ऑगस्ट रोजी थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभाच्या कार्यक्रमात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं गायलं. या गाण्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश दिले. यानंतर विभागीय आयुक्तांकडून रेणापुरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन करण्यात आले. उमरी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारीच्या खुर्चीवर बसून गाणे गायल्याने निलंबन केले आहे. 

हेही वाचा: Ahilyanagar Crime : धक्कादायक ! अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह ; पतीला अटक, मेहुणा फरार

नेमकं प्रकरण काय?
नांदेडच्या उमरी येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांची लातूरच्या रेणापुर येथे बदली झाली होती. 29 जुलैला त्यांची बदली झाली आणि 30 जुलैला थोरातांना कार्यमुक्त केले. त्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे 8 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमरी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार प्रशांत थोरात यांनी खुर्चीवर बसून गाण गायलं आहे. 'तेरे जैसा यार कहा' हे गाणं प्रशांत थोरात यांनी शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गायले. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाल्याने थोरातांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश दिले. यानंतर विभागीय आयुक्तांकडून रेणापुरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन करण्यात आले. 


सम्बन्धित सामग्री