हितेश मेश्राम. प्रतिनिधी. नागपूर: रविवारी रात्री नागपूरमधील कामठी रोडवर असलेल्या एडन ग्रीन्स रिसार्ट येथे 'फ्रेंड्स अँड बियॉंड' पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ही पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये वाद झाला होता. तसेच, या घटनेची माहिती जुनी कामठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या दरम्यान आयोजकाचा उर्मटपणा समोर आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत आयोजक एका पोलिस अधिकाऱ्याला धमकावताना दिसत आहे. इतकच नाही, तर आयोजक म्हणाला, 'मी थेट बावनकुळेंशी बोलेन'. या घटनेमुळे, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा: Mahadevi Elephant Kolhapur: सरकार संपूर्ण ताकद लावणार, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सरसावले
यावर, पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी प्रतिक्रिया दिली की, 'कामठी रोडवर असलेल्या एडन ग्रीन्स रिसार्ट येथे 'फ्रेंड्स अँड बियॉंड' पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या पार्टीत दिलेल्या नियम आणि अटी-शर्तींचे उल्लंघन झाले. त्यामुळे, कारवाई करण्यासाठी जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा, आयोजकाने पोलिसांना धमकी दिली की, मी थेट बावनकुळेंशी बोलेन'.
हेही वाचा: Nashik Crime News: मद्यपान करण्यास पैसे न दिल्याने स्वत:चे घर पेटविले
पुढे, ते म्हणाले की, 'पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने धमकी देणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, वेदांत छाबरिया, रितेश भदाडे, आकाश सालम या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बदनामी केल्याने त्यांच्याही कार्यालयातून कामठी पोलिसात तक्रार देण्यात आली. यापुढे, राजकीय व्यक्तीचा किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाचा वापर करून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल'.