Monday, September 01, 2025 12:55:51 PM

हिंगोलीच्या पालकमंत्रीपदावरून झिरवळ नाराज; काय म्हणाले झिरवळ?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेत्यांमधील नाराजीचं सत्र पालकमंत्रिपदावरुनही कायम आहे.


हिंगोलीच्या पालकमंत्रीपदावरून झिरवळ नाराज काय म्हणाले झिरवळ

मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेत्यांमधील नाराजीचं सत्र पालकमंत्रिपदावरुनही कायम आहे. आधी रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला. दोन्ही जिल्ह्यातील नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली. आता हिंगोलीचे पालकमंत्री झिरवळ यांनी केलेल्या विधानामुळे नवा वादाला तोंड फुटलं आहे.

मी गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकत्व दिलं अशी खंत हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केली आहे.  झिरवळ यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे त्यावर झिरवळ समाधानी नसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यावर पक्षाचे नेते अजित  पवार यांनी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारवर उपरोधिक टिका केली आहे. पालकमंत्रीपदावरून गिरीश महाजन यांनी आता सावध पवित्रा घेत मुख्यमंत्री फडणवीस याबाबतचा योग्य निर्णय घेतील असे सांगत कोणाची वर्णी कुठे लागेल हे देवालाच माहित अशी टिप्पणी त्यांनी केलीय. तर रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असा पवित्रा राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनी घेतला आहे.

हेही वाचा : मंत्री, पालकमंत्रीपदावरून शिवसेनेत नाराजी

महायुती सरकार स्थापन झाल्यापासून तीन पक्षात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. आधी मंत्रिमंडळात किती जणांचा समावेश यावरून नंतर कोणते खाते मिळणार यावरून आणि आता पालकमंत्रीपदावरून वाद सुरूच आहे.


सम्बन्धित सामग्री