Monday, September 01, 2025 11:08:44 AM

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' तारखेनंतर खात्यातून काढता येणार 25 हजार रुपये

तीन लाखांहून अधिक ग्राहक असलेल्या या बँकेच्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आरबीआयने ग्राहकांना पैसे काढण्याची सशर्त परवानगी दिली आहे.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी या तारखेनंतर खात्यातून काढता येणार 25 हजार रुपये
New India Cooperative Bank
Edited Image

रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाकडून गेल्या काही दिवसांपूर्वी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईचे संचालक मंडळ 12 महिन्यांच्या कालावधीसाठी बरखास्त करण्यात आले होते. आरबीआयने मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पैसे काढणे, ठेवी, कर्ज आणि कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर निर्बंध लादले होते. या बँकेच्या बहुतेक शाखा मुंबई आणि ठाणे येथे आहेत. तीन लाखांहून अधिक ग्राहक असलेल्या या बँकेच्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आरबीआयने ग्राहकांना पैसे काढण्याची सशर्त परवानगी दिली आहे.

ग्राहकांना एकावेळी काढता येणार 25 हजार रुपये - 

आरबीआयने प्रशासकाशी सल्लामसलत करून बँकेच्या रोखतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने (RBI) 27 फेब्रुवारी 2025 पासून प्रति ठेवीदार 25 हजार रुपयांपर्यंत (पंचवीस हजार रुपये फक्त) ठेवी काढण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. वरील सवलतीमुळे, एकूण ठेवीदारांपैकी 50 टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना त्यांची संपूर्ण शिल्लक रक्कम काढता येईल आणि उर्वरित ठेवीदार त्यांच्या ठेव खात्यातून 25 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. 

हेही वाचा - मोठी बातमी! आता ATM Card द्वारे काढता येणार PF ची रक्कम

ठेवीदार हे पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेचा तसेच एटीएमचा वापर करू शकतात. तथापि, प्रति ठेवीदार काढता येणारी एकूण रक्कम 25 हजार रुपये किंवा त्यांच्या खात्यातील उपलब्ध शिल्लक, यापैकी जे कमी असेल ती असेल. मध्यवर्ती बँकेने सुमारे दोन आठवड्यांपूर्वी मुंबई स्थित सहकारी बँकेवर  कठोर निर्बंध लादले होते, ज्यामध्ये ग्राहकांना पैसे काढण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली होती.  आरबीआयने बँकेच्या तरलता आणि आर्थिक स्थिरतेबद्दल चिंता व्यक्त करत त्यावर सर्वसमावेशक निर्देश (एआयडी) लादले होते.

हेही वाचा -  चुकीचे चलन जारी झाल्यास तक्रार कोठे करावी? जाणून घ्या ऑफलाइन आणि ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया

आरबीआयच्या या निर्णयानंतर बँकेच्या कोणत्याची ग्राहकाला बँकेतून पैसे काढता येत नव्हते. परंतु, आता रिर्झव्ह बँकेने आता बँकेच्या रोख स्थितीचा आढावा घेतल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने म्हटले आहे की, 50% पेक्षा जास्त खातेधारक त्यांच्या संपूर्ण ठेवीची रक्कम काढू शकतील.
 


सम्बन्धित सामग्री