Monday, September 01, 2025 07:15:33 AM

Mumbai Building Collapse: मदनपुरा येथे पोस्ट ऑफिसची जुनी इमारत कोसळली

भायखळा पश्चिम येथील मदनपुरा भागात असलेली जी+3 मजली म्हाडा इमारत शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी दोन टप्प्यांत कोसळली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

mumbai building collapse मदनपुरा येथे पोस्ट ऑफिसची जुनी इमारत कोसळली
Edited Image

मुंबई: सोमवारी सकाळी दक्षिण मुंबईतील मदनपुरा भागात एक जुनी इमारत कोसळली. भायखळा पश्चिम येथील मदनपुरा भागात असलेली जी+3 मजली म्हाडा इमारत शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी दोन टप्प्यांत कोसळली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बीएमसीच्या मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्टच्या रात्री 2:02 वाजता इमारतीचा पहिला आणि तिसरा मजला मागच्या बाजूने कोसळल्याची घटना घडली होती. ही इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती. ती सी1 धोकादायक श्रेणीत समाविष्ट होती.

हेही वाचा - Sambhajinagar Accident: कार दुभाजकाला धडकल्याने कारने घेतला पेट; कारमधील पाच शिक्षक जखमी

दरम्यान, 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11:36 वाजता संपूर्ण इमारत कोसळल्याचे वृत्त मिळाले. मदनपुरा पोस्ट ऑफिसजवळ असलेल्या या जुन्या इमारतीची स्थिती अत्यंत धोकादायक असल्याने ती रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर बीएमसी, अग्निशमन दल, पोलिस यंत्रणा, 108 रुग्णवाहिका सेवा आणि म्हाडा कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ढिगाऱ्याखाली कोणी अडकलेले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु, तरीदेखील घटनास्थळी शोध व बचावकार्य सुरू आहे.

हेही वाचा - नंद्राबादजवळ भरधाव कारने 2 शेतकऱ्यांना चिरडले; चालकाला अटक

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण - 

घटनास्थळाजवळील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, परिसरात अन्य जुन्या इमारतींबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अशा इमारतींच्या नियमित तपासणीची आणि वेळेवर पुनर्विकासाची मागणी केली आहे. या घटनेने मुंबईतील जिर्ण इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला आहे. पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असून  त्यातून होणारी संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.
 


सम्बन्धित सामग्री