बीड : आता आम्ही जी बातमी दाखवणार आहोत त्या बातमीनं तुमचं काळीज पिळवटून जाईल, डोळ्यांतून अश्रू येतील. ही बातमी एका कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या चिमुकल्या मुलीची आहे. हो, चिमुकल्या मुलीचीच. बीडमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मुलीचे बोल काळजापर्यंत पोहोचतात. अवकाळी पावसाने शेतातले कांदे वाहून गेले. कांद्यांचा अक्षरश: चिखल झाला आणि चिमुकलीच्या डोळ्यात पाणी आलं.
साहेब मी शाळेत कशी जाणार, माझे पप्पा बोलले होते कांदे विकल्यावर तुला चप्पल घेऊन देईल. तुझी फी भरेन ही चिमुकलीची आर्त साद आहे. आष्टी तालुक्यातील शिदेवाडी येथील महेश बापू दरेकर यांनी तीन एकरमध्ये गेल्या पाच महिन्यांपूर्वी कांदा लागवड केला होता. अवकाळीमुळे महेश दरेकर यांच्या शेतातील जवळपास 300 गोणी कांदा वाहून गेला. चिमुकल्या प्रगतीने मदतीसाठी साद घातलीच आहे. तिच्याबरोबर तिच्या आईनेही मदसाठी हात पुढे केलाय.
हेही वाचा : लातूरच्या एकुर्गा शाळेच्या सहा खोल्या जीर्ण
अवकाळीने अक्षरश: शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. कर्ज काढून पिकवलेली शेतीही वाहून गेलीय. आज आम्ही एका चिमुकलीची भावना सांगितलीं, अशी अनेक चिमुकली मुलं आहेत. त्यांची हाक, मदतीसाठीची साद प्रशासनापर्यंत पोहोचत नाही. अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांना एक घास खाण्याबरोबरच मुलांची शाळा पूर्ण करणार याची भ्रांत पडलीय.