रोहन कदम. प्रतिनिधी. पुणे: 'दगडशेठ हलवाई गणपतीसाठी सगळ्या शहराला वेठीस धरू नका, अशी इतर गणेशोत्सव मंडळांची मागणी आहे. तसेच, पुणे शहरातील इतर मंडळांनी पोलिस आयुक्तांना तशी मागणी सुद्धा केली आहे. सर्वात शेवटी दगडूशेठ गणपती मिरवणूकीत सहभागी व्हायचा. त्यामुळे, गैरसोय होते आणि त्यांना सकाळी निघायचं आहे, असे सांगण्यात यायचे. 'हा उत्सव पुणेकरांचा आहे, दगडूशेठ हलवाई गणपतीचा नाही', अशी प्रतिक्रिया गणेशोत्सव मंडळांनी दिली.