महाराष्ट्र : महाराष्ट्रात नेहमीच काहीना काही डावपेच सुरु असतात. एकीकडे महायुती सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा असतांनाच आता एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठीच ठाण्यात जनता दरबार भरवला जातोय कि काय असा प्रश्न सर्वानाच पडलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुकीच्या पार्शवभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करताय याच पार्शवभूमीवर भाजपही जोरदार तयारी करतोय. त्यासाठीच राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात पाठवण्यात आले. गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. आता, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने भाजप एकनाथ शिंदेंना घेरणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. माजी खासदार संजीव नाईक यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याची दखल घेत गौप्यस्फोट केलाय.
हेही वाचा: शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने खळबळ
काय म्हणाले संजीव नाईक?
ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, अशी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची भावना आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेच स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले. युती करायची की नाही याबाबत आमचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा 24 फेब्रुवारीला जनता दरबार होणार आहे.
त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नाईक यांनी शनिवारी जनता दरबार स्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जेव्हा ठाण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली होती, असे नाईक यांनी सांगितले.