सोलापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यानंतर थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा पोहोचवणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना 'कारणे दाखवा' अशी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तीन महिन्यांसाठी मंदिरात प्रवेशबंदी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: लोणावळा पर्यटन स्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
सीसीटीव्हीत आढळले पुजाऱ्यांचे वर्तन:
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले की संबंधित पुजारी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकले. त्यामुळे, मंदिर प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत मंदिर संहितेच्या कलम 24 आणि 25 अंतर्गत संबंधितांना नोटीस बजावली आहे. 'तीन दिवसांत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास, या पुजाऱ्यांना तीन महिन्यांसाठी मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घातली जाईल', असे म्हटले जात आहे.