पुणे: पुणे महापालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी ₹12,618 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये पुणेकरांना कोणतीही करवाढ लागू करण्याचा प्रस्ताव नाही, तर महापालिकेने पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा आणि आरोग्य सेवांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी केल्या आहेत.
महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अर्थसंकल्प सादर करतांना यावर चर्चा केली आणि पुणे महापालिकेने नगर विकासाच्या दृष्टीने मजबूत योजनांची मांडणी केली. यामध्ये इमारती बांधकाम, रस्ते, नदी सुधारणा, आरोग्य सुविधा, आणि पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्रचंड रक्कम राखीव ठेवली आहे.
अर्थसंकल्पातील मुख्य बाबी:
स्थानीय संस्था कर: ₹545 कोटी
जीएसटी: ₹2,701 कोटी
मिळकत कर: ₹2,847 कोटी
बांधकाम विकास शुल्क: ₹2,899 कोटी
पाणीपट्टी: ₹618 कोटी
शासकीय अनुदान: ₹1,633कोटी
कर्ज रोखे: ₹300 कोटी
इतर: ₹975 कोटी
पुणेकरांना आगामी वर्षात मीटर प्रमाणे पाणी वापराचे बील भरण्याची व्यवस्था लागणार आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी याबाबत माहिती दिली असून, समान पाणीपुरवठ्याची योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे.
आगामी योजनांसाठी तरतुदी:
इमारतींच्या बांधकामासाठी: ₹ 490 कोटी
रस्त्यांसाठी: ₹1126 कोटी
नदी सुधारणा योजनेसाठी: ₹396 कोटी
आरोग्यासाठी: ₹569कोटी
पाणीपुरवठ्यासाठी: ₹१,६६५ कोटी
घनकचरा व्यवस्थापनासाठी: ₹१४२ कोटी
34 गावांसाठी: ₹६२३ कोटी