Wednesday, August 20, 2025 01:41:33 PM

Maharashtra Rain Live Update: मुंबईत पावसाने जोर धरला, राज्यात कुठे मुसळधारेचा इशारा?

मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाने धरला आहे. शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे. तसेच मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

maharashtra rain live update मुंबईत पावसाने जोर धरला राज्यात कुठे मुसळधारेचा इशारा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाने धरला आहे. शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे. तसेच मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

मुंबई, भिवंडी, रायगड , गोंदियात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबलंय. तर अंधेरी सबवेत पाणी साचलं आहे. पाणी साचल्यानं सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भिवंडी, रायगडमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. तर गोंदियातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. 

हेही वाचा: मराठी नाही बोलली तर भोकं पडणार का?, केतकी चितळेचं वादग्रस्त विधान चर्चेत

मुंबईसह उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईतील पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईत ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे. कर्जत खालापूर तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. खालापूरमधील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट आहे. नवी मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस चालू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पहाटेपासून जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. मुसळधार पावसामुळे सखोल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. 

राज्यात कुठे मुसळधारेचा इशारा?

रेड अलर्ट

रायगड
सिंधुदुर्ग
रत्नागिरी
गडचिरोली
चंद्रपूर
भंडारा
गोंदिया

ऑरेंज अलर्ट

मुंबई
संभाजीनगर
नागपूर
वर्धा
अमरावती 

यलो अलर्ट

पालघर
 नाशिक
 सातारा
 कोल्हापूर


 


सम्बन्धित सामग्री