मुंबई : राज्यात निवडणुकीआधी आलेली लाडकी बहीण योजना कायम चर्चेत राहिली आहे. या योजनेमुळे महायुती सरकारला लाडक्या बहीणीची भरघोस मत मिळाली आहेत. मात्र आता या योजनेविषयी विविध चर्चा पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा वारंवार केली जात आहे. यावरु विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचेही दिसून आले आहे. त्यातच आता लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्यता मिळावी हा लाडकी बहीण योजनेमागचा उद्देश आहे. मात्र याच योजनेवर आता ताशेरे ओढले जात आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लाडक्या बहिणींच्या पैशांचं काय झालं असा सवाल केला आहे. दरम्यान लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. राज ठाकरेंचं काम बोलायचं आहे ते बोलतात असा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंवर केली आहे. तसेच बहिणींना हप्ता देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : कळंबमधील महिला हत्या प्रकरण; मनिषा बिडवेंच्या हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक
'बहिणींना हप्ता देण्यासाठी सरकार कटिबद्ध'
लाडके बहिण योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना जर बंद व्हायची असती तर ती मागच्या काळातच बंद झाली असती. निवडणूक झाल्यावर सुद्धा लाडकी बहीण योजना ही सुरू आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. राज ठाकरे यांचं कामच आहे. जे बोलायचं आहे ते बोलायचं. मात्र जे काही बोलले ते शेवटपर्यंत बोललं पाहिजे असं मला वाटतं असा टोला गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
'कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितली कोणी?'
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी शिवतिर्थावरुन लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं होत. महाराष्ट्रातील जनतेला मला विचारायचं आहे, की तुम्ही इतक्या भाबडेपणाने मतदान करता तरी कसे. ही लाडकी बहीण योजना... आता या लाडकी बहीण योजनेचे 2100 कोटी करणार, जर 2100 कोटी केले तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवर 63 हजार कोटीचं कर्ज होईल. म्हणजे पाच वर्षाचे तीन ते चार लाख कोटी होतात. हे पैसे फक्त वाटण्यासाठी. पण ते वाटू शकत नाहीत. सरकारकडे पैसे नाहीत, तर ही देखील योजना बंद होणार. कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितली कोणी? असा सवाल राज यांनी सरकारला केला आहे.