Monday, September 01, 2025 06:41:14 AM

रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्याचा फोटोसमोर; छेड काढणारा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर मुलांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेत छेड काढल्याची घटना समोर आली आहे.

रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्याचा फोटोसमोर छेड काढणारा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती

जळगाव : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर मुलांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेत छेड काढल्याची घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक पावित्रा घेतला आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पाहायला मिळत आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचं काय, असा सवाल केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे.

दरम्यान रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्याचा फोटो समोर येत आहे. छेड काढणारा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदेंसोबत पीयूष मोरेचे फोटो असल्यानं खळबळ उडाली आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची कोथळी येथील संत मुक्ताईनगर यात्रा उत्सवामध्ये छेडछाड करण्यात आली असून या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अनिकेत भोई, पियुष मोरे, सोम माळी, अतुल पाटील, किरण गवळी अशी आरोपींची आहेत.

हेही वाचा : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा? राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

नेमके आरोप काय?

मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य काही मुलींची छेड काढल्याचा आरोप आहे. मुक्ताईनगरच्या कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेतील प्रकार उघड झाला आहे. टवाळखोर मुलांनी मुलींच्या मनाविरूद्ध त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रक्षा खडसेंच्या सुरक्षारक्षकांच्या तक्रारीवरुन मुक्ताईनगर पोलिसांत चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  गुन्हा दाखल मात्र आरोपींना अटक न केल्यानं रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. टवाळखोर मुलांना तातडीनं अटक करण्याची मागणी रक्षा खडसेंनी केली आहे.

 


सम्बन्धित सामग्री