Wednesday, September 03, 2025 09:35:59 PM

रणवीर अलाहबादियाच्या अश्लील विधानामुळे फॉलोअर्स घटले

कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादियाला त्याच्या एका अश्लील कमेंटमुळे युजर्सच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे.

रणवीर अलाहबादियाच्या अश्लील विधानामुळे फॉलोअर्स घटले

मुंबई : कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादियाला त्याच्या एका अश्लील कमेंटमुळे युजर्सच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये पालकांबद्दल असभ्य विधान रणवीर अलाहाबादियाने केलं होतं. यावरून नेटकऱ्यांनी रणवीरवर जोरदार हल्ला चढवला आहे.  या वादाने रणवीरच्या शोवर आणि फॅन फॉलोइंगवर मोठा परिणाम झाला आहे. रणवीरवर देशभरात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

काय आहे नेमकं प्रकरण?

समय रैना चा शो 'इंडियाज गॉट लेटेंट'काही महिन्यांपासून चर्चेत होता. या शोमध्ये यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली आहेत. शोच्या एका एपिसोडमध्ये आशीष चंचलानी, अपूर्व मुखीजा,रणवीर अल्लाहबादिया आले होते. या शोमध्ये रणवीर अलाहबादियाने आई-वडिलांविषयी अश्लील विधान केलं आहे. यानंतर रणवीर अल्लाहबादियावर प्रचंड टीका झाली. नेटकऱ्यांनी रणवीरवर कारवाई करण्याची मागणीही केली. त्याच्याविरोधात देशभरात गुन्हे दाखल करण्यात आलेत. रणवीरविरोधात संसदेतही मुद्दा गाजला आहे. त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा : धस यांच्या भेटीला राजकीय संशयाचं वलय; विरोधकांकडून जोरदार निशाणा

समाज माध्यमांवर प्रसिध्दी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी अश्लील आणि असभ्य मजकूर माध्यमात वापरण्याचा एक ट्रेंड अलिकडे सुरू झाला आहे. मात्र त्यावर नेटकऱ्यांचाच अंकुश आहे. अशा कंटेंट निर्मिती कऱणाऱ्यांनाही चाप बसवावा अशी मागणी आता जोर धरू लागली असून रणवीरसारख्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ असल्याची चर्चा आहे. 
 


सम्बन्धित सामग्री