जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधमाकडून पाच वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे परिसरातील नागिरकांनी आरोपीला बेदम मारहाण केली आहे.
जळगाव जिल्ह्यात पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाला आहे. एका तरूणाने अल्पवयीन मुलीवर आपल्या घरात बोलवत तिच्यावर बलात्कार केला आहे. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. तसेच त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. दरम्यान मुलीवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा : सलमान खानचा रिॲलिटी शो बंद होणार? बिग बॉस 19 बद्दल मोठी अपडेट समोर, म्हणून उचललं जातंय हे पाऊल
पाच वर्षीय बालिकेवर एका नराधम तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात गोरगावले शिवारात घडल्याने खळबळ उडाली आहे. पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरी बोलवत अत्याचार करण्यात आला. ज्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला तो केळी वाहतूक करुन स्वत:चा उदरनिर्वाह करतो. तरुणाला मुलगी एकटी असल्याचे दिसताच त्याने तिला घरी बोलवले आणि तिच्यावर बलात्कार केला. यामुळे परिसरातील नागरिकांचा संताप झाला आणि त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. चोपडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सदर तरुणाला बेदम चोप देत,चोपडा पोलिसांच्या हवाली केले आहे.
दरम्यान ही घटना निंदनीय आहे. अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. अक्षय शिंदेसारखं यालाही एन्काऊंट करून मारा अशी प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली आहे. या घटनेमुळे चोपडा परिसरातील नागरिकांनामध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच त्यांच्याकडून आपल्या मुलींप्रती काळजी व्यक्त होत आहे. वारंवार बलात्काराची घटना घडत आहेत. त्यामुळे विकृत मानसिकतेला आळा घालण्याची गरज आहे.