Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरणही तापले असून, अनेक गंभीर खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून, संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडीओ आणि 8 फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत.
हत्या कबुली व आरोपींचे जबाब
आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांसमोर कबुली जबाब देत, संतोष देशमुख यांचा अपहरण करून अमानुषपणे खून केल्याची कबुली दिली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे स्पष्ट केले. यामध्ये प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असल्याचा दावा करण्यात आला असून, पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याचे नमूद करण्यात आले.
अत्याचाराचा धक्कादायक पुरावा – 15 व्हिडीओ आणि 8 फोटो
आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये तब्बल 2 तास चाललेल्या मारहाणीचे 15 व्हिडीओ आणि 8 फोटो टिपले होते. पोलिसांनी हा सर्व डेटा ताब्यात घेऊन न्यायालयात सादर केला आहे. या व्हिडीओंमध्ये देशमुख यांना लाथा-बुक्क्यांनी, पाईपने आणि वायरने मारहाण केली जात असल्याचे दिसते.
हेही वाचा: वडिलांच्या अफेअरचा आर्थिक तणाव, दिशा सालियानने घेतला टोकाचा निर्णय; क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक बाबी उघड
त्या 15 व्हिडीओंमध्ये नेमकं काय आहे?
• व्हिडीओ 1: (3.46 PM) मारहाणीला सुरुवात. मोबाईलमधील हा पहिला व्हिडिओ ज्यात आरोपी देशमुख यांना पाईप,वायरने आणि लाथा बुक्यांनी मारताना दिसत आहेत.
• व्हिडीओ 2: (3.47 PM) 53 सेकंदांचा व्हिडीओ. देशमुख यांच्यावर आरोपी शिवीगाळ करत वायरने मारहाण करतायत आणि देशमुखांची पॅंट काढत आहेत.
• व्हिडीओ 3: (3.38 PM) आरोपी संतोष देशमुख याना पाठीत वायरसारख्या हत्याराने वर करत मुठीने मारहाण करताना दिसतायत.
• व्हिडीओ 4: (3.51 PM) आरोपी शिव्या देत मारहाण करत असून, महेश केदार व्हिडीओ शूट करतोय तर याच व्हिडीओमध्ये सुदर्शन घुलेची गाडीही दिसत आहे.
• व्हिडीओ 5: (3.52 PM) 7 सेकंदांचा व्हिडीओ. आरोपी जबरदस्तीने कॉलर धरून उठवून बसवत आहेत.
• व्हिडीओ 6: (3.53 PM) 36 सेकंद. देशमुख यांच्या संपूर्ण शरीरावर गंभीर मारहाण केल्याचे दिसत आहे.
• व्हिडीओ 7: (3.54 PM) 14 सेकंद. व्हिडिओमध्ये देशमुखांना पाईपने मारहाण असताना मोबाईलमध्ये शूट करताना एक व्यक्तीचा हात दिसतो.
• व्हिडीओ 8: (3.54 PM) 4 सेकंद. या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना बळजबरीने काही विचारत असल्याचं दिसतंय
• व्हिडीओ 9: (3.55 PM) 52 सेकंद.देशमुख यांना तोंडावर, इतर ठिकाणी मारहाण झालेली आहे.त्याचबरोबर आरोपींनी सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे, असं जबरदस्ती म्हणायला लावलं आहे.
• व्हिडीओ 10: (3.58 PM) 2 सेकंद. या व्हिडिओत संतोष देशमुख यांना आरोपी कपडे काढून अंतरवस्त्रावर जोरदार कपडे काढून अमानुष मारहाण.
• व्हिडीओ 11: (3.58 PM) 5 सेकंद. देशमुखांना अंतरवस्त्रावर बसवून दुसरा आरोपी व्हिडिओ काढत आहे.
• व्हिडीओ 12: (3.59 PM) 12 सेकंद. आरोपी संतोष देशमुखांचे केस ओढत जबरदस्ती बोलायला लावत आहेत.
• व्हिडीओ 13: (5.34 PM) 1.44 मिनिट. देशमुखांना स्कॉर्पिओ गाडीजवळ अंतरवस्त्रावर झोपवल्याचे दिसते, रक्ताने माखलेले कपडे परत घालण्यास भाग पाडत आहेत.
• व्हिडीओ 14: (5.35 PM) 1.04 मिनिट. देशमुखांना शर्ट घालताना दिसत आहे. आणि शर्ट घालण्याआधी फाटलेले बनियन व रक्तानी माखलेली बनियन फेकून देताना दिसत आहे.
• व्हिडीओ 15: (5.53 PM) 24 सेकंद. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा कण्हण्याचा आवाज ऐकू येत आहे.
या हत्याकांडात वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी पोलिसांच्या हाती लागली असून, त्यामधून 19 महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. या गाडीच्या काचेवर सुधीर सांगळेचे फिंगरप्रिंट्स सापडले असून, ते फॉरेन्सिक तपासणीत मॅच झाले आहेत.
आरोपी प्रतीक घुले याने देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेली जाड बांबूची काठी पोलिसांनी जप्त केली आहे. ही काठी काटेरी झुडपामध्ये लपवण्यात आली होती.देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बुधवारी पार पडली असून, याप्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील सुनावणीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.