Monday, September 01, 2025 09:16:56 AM

तब्बल 150 जखमा, कोणत्या शस्त्रांनी वार झाले? संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा खुलासा!

आयडीच्या अहवालानुसार, संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी विशेष हत्यारं बनवली होती.

तब्बल 150 जखमा कोणत्या शस्त्रांनी वार झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा खुलासा

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. सीआयडीनं न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात त्यांच्या क्रूर हत्येचे धक्कादायक फोटो समोर आले होते. आता आरोपींनी हत्या करण्यासाठी कोणती शस्त्रं वापरली, याचा खुलासा झाला आहे.

सीआयडीच्या अहवालानुसार, संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी विशेष हत्यारं बनवली होती. ही हत्यारं गॅसचा पाईप, लोखंडी क्लच वायर पाईप आणि इतर धातूंच्या वस्तू वापरून तयार करण्यात आली होती. गॅस पाईप 80 सेंटीमीटर लांब आणि 2.50 सेंटीमीटर रुंद त्याचबरोबर क्लच वायर पाईप 103 सेंटीमीटर लांब आणि 2 सेंटीमीटर रुंद या शस्त्रांचे फोटो पाहिल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील!

संतोष देशमुख यांना आरोपींनी अमानुष मारहाण केली. त्यांना तब्बल 150 हून अधिक जखमा होत्या. त्यांच्या प्रत्येक अवयवाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या शरीरात अडीच ते तीन लिटर रक्त गोठले होते.

फोटो पाहून संताप अनावर!
देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांना संताप अनावर झाला. आरोपींनी त्यांच्यावर विविध शस्त्रांनी हल्ला केला. त्यांच्या अंगावर एकही जागा सुस्थितीत नव्हती. शरीर काळं-निळं पडलेलं होतं.


सम्बन्धित सामग्री