Monday, September 01, 2025 05:57:15 PM

सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना घर बांधून देण्याची जबाबदारी आता शिवसेनेची

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले. सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्युनंतर देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून अनेक मोर्चे काढण्यात आले.

सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना घर बांधून देण्याची जबाबदारी आता शिवसेनेची

बीड: दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले. सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्युनंतर देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून अनेक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची स्वप्नपूर्ती होणार असल्याचं समोर आलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना घर बांधून देण्याची जबाबदारी आता शिवसेनेने घेतलेली आहे.  

हेही: भाजप खासदाराच्या वक्तव्याने खळबळ

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. घरातील करता माणूस गेला पण त्याच्या मागे संसार उघडा पडला होता. याच देशमुख कुटुंबाच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे धावून आले असून दिलेल्या शब्दाप्रमाणे आजपासून देशमुखांच्या घराचे काम सुरू झाले आहे. आज बोअर घेतला त्याला पाणीही लागले त्यानंतर नारायणगडचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन करत बांधकामास सुरूवात करण्यात येणार आहे.

या घरासाठी जागा निश्चित करण्यात आली असून बोअर घेण्यात आलास त्याला पाणी देखील लागले आहे. मस्साजोग येथे श्री क्षेत्र नारायणगडचे मठाधिपती महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून हे घर उभारले जात आहे. भूमिपूजन सोहळा वेळी यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप सचिन मुळक स्वप्निल गलधर यांची उपस्थित राहणार आहे.

दरम्यान आता सरपंच संतोष देशमुख यांच्या घराची स्वप्नपूर्ती होणार आहे.  घरासाठी जागा निश्चित करण्यात आली असून बोअर घेण्यात आलास त्याला पाणी देखील लागले आहे.तोष देशमुख यांच्या हत्येनंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. घरातील करता माणूस गेला पण त्याच्या मागे संसार उघडा पडला होता. याच देशमुख कुटुंबाच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे धावून आले असून दिलेल्या शब्दाप्रमाणे आजपासून देशमुखांच्या घराचे काम सुरू झाले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मोरे कुटुंबाला देखील मदत केली होती. त्यानंतर आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे घर बांधण्याची जबाबदारी देखील आता शिवसेनेने घेतली आहे. 


 


सम्बन्धित सामग्री