Monday, September 01, 2025 12:57:27 AM

होळीच्या दिवशीच खोक्याचं घर पेटवलं, बीडमध्ये खळबळ

बीड जिल्ह्यातील चचर्चेत असलॆल्या खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घराला होळीच्या रात्री अज्ञातांनी आग लावल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

होळीच्या दिवशीच खोक्याचं  घर पेटवलं बीडमध्ये खळबळ

बीड जिल्ह्यातील चचर्चेत असलॆल्या खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घराला होळीच्या रात्री अज्ञातांनी आग लावल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने त्याचे घर अतिक्रमण म्हणून जमीनदोस्त केल्यानंतर काही तासांतच ही घटना घडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या आगीत घरातील काही मौल्यवान वस्तू जाळून खाक झाल्या असून पोलीस तपास सुरु आहे. 

गोंदिया जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्याने काळवीट, मोर आणि हरणांची शिकार करून त्यांची तस्करी केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने शिरूर कासार येथे त्याने अतिक्रमण करून बांधलेले घर पाडले होते. मात्र, या कारवाईनंतर काही तासांतच अज्ञातांनी घराला आग लावल्याने हा संपूर्ण प्रकार संशयास्पद ठरतो.

हेही वाचा: खोक्या भाईला महाराष्ट्रात आणलं, थोड्याच वेळात बीडला आणणार

आगीची माहिती मिळताच बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने आग आटोक्यात आणली. प्राथमिक तपासात ही आग हेतुपुरस्सर लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान काही महिलांना मारहाण झाल्याची माहितीही पुढे आली आहे. जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

सतीश भोसलेच्या अटकेनंतर आणि त्याच्या घरावर झालेल्या कारवाईनंतर हा संपूर्ण विषय राज्यभर गाजत आहे. बीडमधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी वनविभागाच्या कारवाईचे समर्थन केले असले तरी, आग लावण्याच्या घटनेमुळे या प्रकरणाला आणखी नवे वळण मिळाले आहे. पुढील तपासानंतरच या घटनेच्या मूळ सूत्रधारांचा उलगडा होईल.


सम्बन्धित सामग्री