Wednesday, August 20, 2025 01:00:46 PM

मुसळधार पावसामुळे नागपूरात शाळा आणि महाविद्यालये बंद; विदर्भात 'ऑरेंज अलर्ट' जारी

मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर 9 जुलै 2025 रोजी बंद राहतील. हा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केला आहे.

मुसळधार पावसामुळे नागपूरात शाळा आणि महाविद्यालये बंद विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी

नागपूर: नागपूरमध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर 9 जुलै 2025 रोजी बंद राहतील. हा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केला आहे.

नागपूरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने आज विदर्भ क्षेत्रात आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD ने नागपूरसह अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी सकाळी 8:30 ते बुधवारी सकाळी 5:30 वाजेपर्यंत नागपूरमध्ये 172.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे, ज्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

हेही वाचा - निधीची तरतूद कशी करायची मला माहीत आहे; पवारांचा सरकारला इशारा

दरम्यान, प्रादेशिक हवामान विभाग नागपूरनुसार, पश्चिम बंगालजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भाचा पूर्व भाग विशेषतः प्रभावित झाला आहे. नागपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे मुसळधार पाऊस पडला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा - लातूरच्या शेतकरी दाम्पत्याला अभिनेता सोनू सूदने दिला मदतीचा हात

मुंबई आणि पुण्यातील हवामान अंदाज - 

आज मुंबईत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. शहरात पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापी, पुणे शहरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर पुण्यातील घाट भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.     


सम्बन्धित सामग्री