पुणे : शिवसेनेचे नेते तथा कसबा विधानसभेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. धंगेकरांनी ट्वीट पोस्ट करत शंतनु कुकडे या पदाधिकाऱ्याने दोन मुलींवर बलात्कार केल्याचे उघड केले आहे. त्या मुलींपैकी एक मुलगी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
रवींद्र धंगेकर यांनी शंतनू कुकडेची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तसेच महिला आयोगाला चौकशीसाठी पत्र दिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. अजित पवार यांनी कुकडेवर कठोर कारवाई करावी अशी विनंती धंगेकरांनी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. कुकडे धर्मांतर करायला लावतो, अनेक जण त्याच्या सोबत असल्याचा खळबळजनक दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
माजी आमदार धंगेकर यांंनी अनेक लोक कुकडेसोबत काम करत आहेत. दोन दिवसांपूर्वी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये शंतनू कुकडेवर गुन्हा दाखल झाला. तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे.त्याचा नेत्यांसोबत वावर आहे असे सांगितले. तसेच तो क्लब चालवत होता, लहान मुलींना अनैतिक संबंध ठेवण्याच्या तक्रारी आहेत. या ठिकाणी अनेक राजकीय लोक पोलिस अधिकारी, शासकीय लोकांचा समावेश होता असा खुलासा धंगेकरांनी केला.
हेही वाचा : पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
धंगेकर म्हणाले, महिला आयोगाला पत्र दिलं त्यांना याप्रकरणाची चौकशी करायला सांगितले. कुकडे धर्मांतर करायला लावतो. अनेक लोक त्याच्यासोबत काम करत आहेत. करोडो रुपये याने जमा केले आहेत. तो अनेक धंदे करतो याचा तपास पोलिसांनी का केलं नाही असा सवाल त्यांनी पोलीस प्रशासनाला केला आहे. तसेच या प्रकरणासंदर्भात सर्व छडा लावून पक्षातून अशा लोकांना काढून टाकावे अशी विनंती अजितदादाना करणार असल्याचे धंगेकरांनी म्हटले आहे.
पुढे धंगेकर म्हणाले बुधवारी पोलिसांना याविषयी माहिती दिली आहे. या प्रकाराला जरब बसवली पाहिजे. समर्थ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गीते यांच्याकडून तपास काढला पाहिजे. पोलिस गुन्हा लपवत आहेत का असा प्रश्न आहे. परदेशातून पैसे येतात. इथे खर्च केला जातो तर याचा तपास लागला पाहिजे. पोलिस आयुक्तांना पत्र लिहून हा तपास सिनियर पोलिस अधिकाऱ्यांकडून काढून घ्यावा आणि सक्षम अधिकाऱ्यांकडे द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच शंतनु कुकडे याची बँक खाती तपासली पाहिजेत. हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचीही चौकशी करावी. अजित पवार यांनी या प्रकरणाचा तपास करत कारवाई केली पाहिजे. पोलिस प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांना किती रक्कम दिली जाते याचा तपास करावा असे धंगेकरांनी म्हटले आहे.