महाराष्ट्र म्हटलं कि राजकारण आलच. महाराष्ट्रात नेहमीच काही ना काही राजकीय घडामोडी घडत असतात त्यातच आता पुन्हा एकदा एका राजकीय वक्तव्याने खळबळ माजलीय. आणि हे वक्तव्य केलाय शरद पवारांनी. माझ्यामुळेच 1999ला वाजपेयी सरकार पडलं असं वक्तव्य करत शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय. त्याचबरोबर मतदानाआधीच त्यांचा खासदार फोडला आणि एक मत कसं मिळवलं ते सांगणार नाही असं शरद पवार म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्याने फक्त राजकीय वर्तुळातच नाही तर सर्व सामन्यांमध्ये देखील चर्चेला उधाण आलंय.
हेही वाचा: Mahashivratri 2025 Upay : शिवलिंगासमोर ३ वेळा टाळी, महाशिवरात्रीला करा उपाय
काय म्हणाले शरद पवार?
17 एप्रिल 1999 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना लोकसभेत बहुमत सिद्ध करायचं होतं. परंतु त्या दिवशी वाजपेयी सरकारला केवळ 269 मतं तर सरकारविरोधात 270 मतं पडली. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांना राजीनामा द्यावा लागला होता. या घटनेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, " मी संसदेत विरोधी पक्ष नेता होतो, हे माझ्या कारकीर्दीबाबत अनेकांना माहित नाही.
माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या काळात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. आम्ही विरोधी पक्षात असताना त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला. हा ठराव एक मतानं मंजूर झाला. आता ते मत कसं मिळवलं मी सांगत नाही. अविश्वासदर्शक ठराव मांडून चर्चेची वेळ असते. त्या वेळेत मी बाहेर जाऊन कोणाशी तरी बोलून परत येऊन बसलो. सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीनं काही वेगळा निर्णय घेतल्यानं एका मतानं सरकार पडलं." असं वक्तव्य शरद पाइरानी केलंय.