पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले. यावर कस्पटे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी वैष्णवीच्या वडिलांना आनंद कस्पटे यांना अश्रू अनावर झाले.
कोर्टात वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर कस्पटे कुटुंबाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी बुधवारी कोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले. वैष्णवी अज्ञात व्यक्तीशी चॅटिंग करत असल्याचा दावा करण्यात आला. कायद्याचे तज्ज्ञ असलेल्या वकिलांना हे बोलणं शोभत नाही. गुन्हा लपवण्यासाठी चारित्र्य हनन करण्यात येत असल्याचा दावा यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी केला. वैष्णवी कुणाशी चॅट करत असल्याची आम्हाला कधीही कल्पना दिली नाही.
हेही वाचा : वैष्णवीच्या सासू आणि नणंदेला जामीन का हवाय? जाणून घ्या..
'लग्न मोडण्याची धमकी देत शशांकने फॉर्च्युनर मागितली'
पुढे बोलताना, शशांकने मोबाईलच्या दुकानातून मला फोन केला की दीड लाखांचा मोबाईल घेऊन द्या. त्या मोबाईलचे मी अजूनही हप्ते भरत आहे. एमजी हेक्टर गाडी बुक केली होती, पण त्यांनी वाद घालून फॉर्च्यूनर मागितली. एमजी हेक्टर दिली तर मी गाडीच जाळून टाकेल अशी धमकी दिली. हगवणे यांच्याकडे स्वतःच्या मालकीची फक्त एकच गाडी आहे. लग्न मोडेल अशी धमकी देऊन त्यांनी मला फॉर्च्युनर मागितली.
'माझ्या मुलीची दोन लग्न मोडण्यात हगवणे कुटुंबाचा हात'
पत्रकार परिषदेतून कस्पटेंनी हगवणेंवर गंभीर आरोप केले. माझ्या मुलीची दोन लग्न मोडण्यात हगवणे कुटुंबाचा हात होता. माझ्या मुलीला मारण्याच्या कटात निलेश चव्हाण देखील सहभागी आहेत. अंत्यविधीच्या दिवशीच करिष्माला फोन करून बाळ मागितलं होतं. राजेंद्र यांच्या भावानेच बाळाची हेळसांड होत आहे, त्याला घेऊन जा, असं सांगितलं. जयप्रकाश हगवणे यांनी चव्हाणकडे बाळ मागितल्यावर त्याने यांनाच धमकी दिली. आमचे व्यावसायिक संबंध असलेल्या बिल्डरकडे हगवणे यांनी पैशाची मागणी केली. मामा जालिंदर सुपेकर यांच्या जीवावर आम्ही काहीही करू शकतो, अशी शशांकने धमकी दिली. दोन कोटी रुपये न दिल्याने शशांकने मला घरात घुसून धमकी दिली. वकिलांना पण मुली असतील, माझ्या मेलेल्या मुलीवर शिंतोडे उडवू नका असे म्हणत कस्पटे कुटुंबियांनी हगवणे यांच्या वकिलांचे दावे खोडून काढले. यावेळी वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.