नवी दिल्ली: ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा असून आज दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. खासदार संजय राऊत यांच्या निवास्थानी ही पत्रकार परिषद घेतली. तसेच आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच ट्रम्पसह चीनवर टीका केली आहे.
मतदाराला ओळख सांगण्याचा जाच कशाला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बिहार मतदार यादीवर केला आहे. ईव्हीएमच्या कामकाजावर प्रश्नचचिन्ह करत त्यांनी बॅलेटपेपरविषयी सांगितले आहे. तसेच ईव्हीएमवर बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मतचिठ्ठी नसेल तर निवडणूक कशाला ?, निवडणुक आयोगावर नियंत्रण कुणाचं ? असे सवालही उद्धव ठाकरेंनी केले आहेत.
हेही वाचा: Mumbai: गोरेगावमध्ये 27 कोटी खर्चून बांधलेला उड्डाणपूल 6 वर्षात पाडला जाणार; महापालिकेच्या निर्णयाने नागरिकांमध्ये संताप
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावर बोलताना, शिंदे त्यांच्या मालकाला भेटायला आले होते अशी टीका ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी चीन दौऱ्यावर त्यांनी मोदींना लक्ष केले आहे. मोदी मित्रासाठी चीनला जात आहेत का ? अशी टीका त्यांनी मोदींवर केली आहे. मोदींना शेतकऱ्यांची आठवण आताच का आली ? असा सवालही त्यांनी मोदींना केला आहे. त्यामुळे देशात सरकार नाही असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर सातत्याने भाष्य करताना दिसत आहेत. यामुळे ठाकरे बंधूचा हिंदीला विरोध आहे असेही त्यांच्याविषयी बोलले जात आहे. यावर विरोध हिंदीला नाही, भाषा सक्तीला असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. त्यामुळे वाचाळवीरांना उद्धव ठाकरेंनी खडसावले आहे. जनतेच्या प्रश्नांवर बोला असेही उद्धव ठाकरे म्हटले आहे.