महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. 27 मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे ) वाट्याला आलेल्या एका जागेसाठी अनेक इच्छुक होते, मात्र अखेर धुळे-नंदुरबारचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांची निवड निश्चित झाली आहे.
शिवसेनेत या जागेसाठी मोठी चुरस होती. माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे आणि विदर्भातील किरण पांडव यांची नावेही चर्चेत होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांवर विश्वास ठेवत चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली आहे.
हेही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा भव्य सोहळा!
राजकीय वर्तुळात रघुवंशी हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांच्या निवडीमुळे शिवसेनेने विधानपरिषदेत आपली ताकद वाढवण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे.