Sunday, August 31, 2025 05:34:59 PM

दिल्लीत 35 तुकडे करून हत्या करण्यात आलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे रविवारी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते पत्नी आणि कुटुंबासह वसईमध्ये राहत होते.

दिल्लीत 35 तुकडे करून हत्या करण्यात आलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Shraddha Walkar's Father Vikas Walkar Dies
Edited Image

Shraddha Walkar's Father Vikas Walkar Dies: श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे रविवारी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते पत्नी आणि कुटुंबासह वसईमध्ये राहत होते. श्रद्धा वॉकर हिची तिच्या 28 वर्षीय प्रियकर आणि लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावालाने 18 मे 2022 रोजी दिल्लीतील मेहरौली परिसरातील एका घरात हत्या केली होती. श्रद्धा आणि आफताब मेहरौली येथे भाड्याच्या घरात राहत होते. श्रद्धाच्या निर्घृण हत्येनंतर तिचे वडिल विकास यांना मोठा धक्का बसला होता. ते अजूनही त्यांच्या मुलीच्या मृतदेहाचे उर्वरित तुकड्याच्या अंत्यसंस्कारासाठी वाट पाहत होते, पण त्याची शेवटची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. 

हेही वाचा - जंगलात शिकारीला गेले अन् सहकाऱ्याचीच केली शिकार, रानडुक्कर समजून झाडली गोळी

या खून प्रकरणात श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष हे मुख्य पुरावे असल्याने, दिल्ली पोलिसांनी ते तिच्या कुटुंबाला दिले नाहीत. श्रद्धाचे कुटुंब आफताबसोबतच्या तिच्या नात्याबद्दल समाधानी नव्हते. यामुळे श्रद्धाचा कुटुंबाशी संपर्क तुटला होता. श्रद्धाच्या मित्रांनी तिचे वडील विकास वालकर यांना सांगितले की, ती अडीच महिन्यांहून अधिक काळ तिच्याशी संपर्क साधू शकले नाहीत. ही माहिती मिळाल्यानंतर विकास वालकर यांनी त्यांची मुलगी श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे दाखल केली. 

हेही वाचा - आईकडून दोन मुलांची गळा दाबून हत्या; नेमकं घडलं काय?

या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर श्रद्धा तिच्या प्रियकर आफताबसोबत दिल्लीत राहते, असे आढळून आले. या संदर्भात मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा शोध सुरू केला आणि आफताबला त्याच्या मेहरौली येथील भाड्याच्या फ्लॅटमधून अटक केली. पोलिसांनी फ्लॅटमधील रेफ्रिजरेटरमधून श्रद्धाच्या शरीराचे उर्वरित तुकडे, रक्ताचे डाग आणि इतर पुरावे जप्त केले. चौकशीदरम्यान आफताबने आपला गुन्हा कबूल केला. आफताब पूनावालाने पोलिसांना सांगितले की, 18 मे 2022 रोजी त्यांनी त्यांच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची वादानंतर गळा दाबून हत्या केली. श्रद्धाच्या हत्येची माहिती कोणालाही समजू नये यासाठी त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते 300 लिटरच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले.

आरोपीला फाशीची शिक्षा द्या - श्रद्धा वालकरचे वडिल 

श्रद्धाची ओळख लपवण्यासाठी आफताबने तिचा चेहरा जाळला होता. श्रद्धाच्या हत्येनंतर पुढील 18 दिवसांपर्यंत, आफताब पूनावाला दररोज रात्री 2 वाजता तिच्या शरीराचे तुकडे छत्तरपूरच्या जंगलात घेऊन जात असे आणि तिथे फेकत असे. आफताब पूनावालाला 12 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली. श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आफताबविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत आणि खटल्याची सुनावणी सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री