आज महाराष्ट्रात पहिला श्रावणी सोमवार आहे. या श्रावणी सोमवारी महाराष्ट्रातील सर्व ज्योतिर्लिंग गजबजली आहेत. महादेवाची पूजा करण्यासाठी भाविक सरसावले आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक एकवटले आहेत. त्याचबरोबर औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पनवेलमधील विरुपाक्ष मंदिरातील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. नवी मुंबई येथील जागृतेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आलेले आहेत. तसेच मुंबईतील बाबुलनाथ महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. 25 जुलैपासून म्हणजेच शुक्रवारपासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरु झाला असून आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. विशेष म्हणजे सोमवारी शंकराची पूजा केली जाते. त्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्व ज्योतिर्लिंग गजबजलेली पाहायला मिळत आहेत.