Monday, September 01, 2025 12:53:01 PM

नाताळनिमित्त गावी जात असताना एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

नाताळच्या सुट्टीसाठी गावी जाताना एका कुटुंबाचा अपघात झाला आहे.

नाताळनिमित्त गावी जात असताना एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

मुंबई : नाताळच्या सुट्टीसाठी गावी जाताना एका कुटुंबाचा अपघात झाला आहे. गावी पोहोचण्याआधीच एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. कारवर कंटेनर पलटल्याने कारमधील आयटी इंजिनिअरसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

 

हेही वाचा : कल्याणमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद, त्या निर्णयामुळे शुक्ला कुटुंबाच्या अडचणी वाढल्या

चंद्रम इगाप्पागोळ हे बंगळुरूमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होते. यामुळे ते कुटुंबासह बंगळुरूमध्ये राहत होते. चंद्रम इगाप्पागोळ,धोराबाई, गण, दिक्षा, आर्या, विजयालक्ष्मी अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे रहिवासी आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

नाताळची सुट्टी असल्याने सर्व कुटुंब मूळगावी येत जात होते. यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर कारवर पडला आणि कारचा चक्काचूर झाला. यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तळकेरेजवळ ही घटना घडली. याप्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री