Sunday, August 31, 2025 07:30:19 PM

सपा आमदार अबु आझमी वादाच्या भोवऱ्यात; वक्तव्य पडलं महागात

सपा पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबाबद्दल वक्तव्य केले आहे.

सपा आमदार अबु आझमी वादाच्या भोवऱ्यात वक्तव्य पडलं महागात

मुंबई : सपा पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबाबद्दल वक्तव्य केले आहे. आझमीच्या वक्व्याने त्याच्यावर टीकेची झोड उठताना दिसत आहे. औरंगजेबाच्या बाजूने अबू आझमीने वक्तव्य केले आहे. त्यामुळे आझमीच्या कारवाईची मागणी होत आहे. 

काय म्हणाला आझमी?
औरंगजेबाच्या काळात भारत देश सोन्याची चिमणी होता. औरंगजेब एक चांगला प्रशासक होता. औरंगजेबाच्या काळात चांगलं शासन होतं असे आमदार अबू आझमीने म्हटले आहे. अबु आझमी आपल्या विधानावर ठाम असल्याचेही पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा : मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जनकल्याण यात्रेचा शुभारंभ

अबु आझमीने औरंगजेबाच्या बाजूने भाष्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशभक्तांच्या विरोधात वक्तव्याने त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विरोधात विधान केल्याने शिंदेंनी संताप व्यक्त केला आहे. 

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही अबु आझमीवर टीका केली आहे. उठसुट महापुरूषांवर बोलले जात आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. कोरटकर, राहुल सोलापूरकर आणि आता अबु आझमी यांनी महापुरूषांवर वक्तव्ये केली आहेत. महापुरूषांवर बोलणाऱ्या या तिघांवरही कारवाई झाली पाहिजे असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : स्वारगेट अत्याचार प्रकरणात नवी माहिती समोर

अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद ठाण्यात उमटताना पाहायला मिळत आहेत. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के अबू आझमी विरोधात गुन्हा नोंद करणार आहेत. 


सम्बन्धित सामग्री