तेजस मोहातुरे. प्रतिनिधी. नागपूर: 'नीट'च्या परीक्षेत अपयश मिळाल्याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या मृत विद्यार्थिनीचे नाव वैदही अनिल उईके (वय: 17) असे असून ती हिंगणा भागातील वानाडोंगरी येथील मंगलमूर्ती कॉलनीजवळ राहणारी होती.
नेमकं प्रकरण काय?
यावर्षी, वैदेहीने 'नीट'ची परीक्षा दिली होती. मात्र, 'नीट'च्या परीक्षेत कमी टक्केवारी मिळाल्याने तिने पुन्हा एकदा परीक्षेच्या तयारीसाठी एका ट्युशन अकॅडमीत शिक्षण घेत होती. मात्र, तरीदेखील 'नीट'च्या परीक्षेत उत्तीर्ण न झाल्याने अनेक दिवसांपासून ती नैराश्यात होती. त्यामुळे वैदेहीच्या पालकांनी तिला या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरकडे पाठवले. ती गोळ्या आणि औषधे देखील घेत होती.
एकीकडे आपली मोठी बहीण एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे तर दुसरीकडे आपल्याला सलग दोनवेळा 'नीट'च्या परीक्षेत अपयश मिळाल्याने वैदेहीने आत्महत्या करण्याचे ठरवले. यादरम्यान, वैदेहीने तिच्या पालकांना सांगितले की ती कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये जात आहे. त्यानंतर, तिचे पालक बाहेर गेले. मात्र, काही वेळानंतर जेव्हा तिचे आई-वडील घरी आले, तेव्हा त्यांनी पाहिले की बराच वेळ होऊनही त्यांची मुलगी बेडरूममधून बाहेर आली नाही. तिच्या पालकांनी तिच्या बेडरूमचा दरवाडा उघडण्याचा प्रयत्नही केले. मात्र, तराही तिने दार उघडले नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी भाडेकरुंना बोलावून बेडरूमचं दार तोडले आणि आत प्रवेश केले. आत पोहोचताच जेव्हा तिच्या पालकांनी ते दृश्य पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी पाहिले की वैदेही पंख्याला लटकली होती. हे दृश्य पाहताच त्यांनी वैदेहीला त्वरीत खाली उतरवलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की वैदेही मृत झाली आहे.
वैदही उईकेचे वडील अनिल उईके नागपूर शहर पोलीस दलात कार्यरत आहे. तसेच, वैदही उईकेची मोठी बहीण एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. वैदहीने एवढ्या कमी वयात आत्महत्या केल्याने परिसरात दुःखाचे वातावरण आहे.