कोल्हापुर : कोल्हापूरमध्ये बारावीच्या परिक्षेत मोठा घोळ असल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थ्यांनी निवडलेले विषय हॉल तिकीटावर नसल्याने विद्यार्थांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.दरम्यान परीक्षा कशी द्यायची? हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.
कोल्हापुरात बारावीच्या हॉल तिकिटावरून सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर विषयांची तफावत असल्याने विद्यार्थी गोंधळात आहेत. त्यामुळे परीक्षा कशी द्यायची असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.
हेही वाचा : Delhi Election Results 2025: मोदींनी दिल्लीही जिंकली; आता केंद्रासह देशावर भाजपाचे अधिराज्य
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ११ फेब्रुवापासून सुरू होत आहे. या वर्षी महाराष्ट्रात परीक्षार्थींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. दहावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत १९ हजारांनी तर बारावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत १७ हजारांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र मिळाले असून आता याच हॉल तिकीटावरून गोंधळ सुरू झाला आहे.
महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकिट मिळाले आहे. परंतु परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विषयांमध्ये आणि हॉल तिकिटावर आलेल्या विषयांमध्ये तफावत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.. विद्यार्थ्यांसह पालक गोंधळात पडले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील पालक महाविद्यालयात गेलेले पाहायला मिळाले. त्यांनी हॉल तिकिटावरून पालकांना जाब विचारला आहे. परीक्षा तोंडावर आली असताना हॉल तिकीटावर झालेल्या चुकांची दुरूस्त करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ उडाला आहे.