सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनी वक्तव्य केलीत. आमदार सुरेश धस यांनी देखील वेळोवेळी या संतोष देशमुख हत्या प्रकरणी आपली मत मांडली. याच हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी मंत्री धंनजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता धनंजय मुंडेंवर टीका करणारे सुरेश धस यांनीच मुंडेंची भेट घेतली असल्याचं समोर आल्याने राजकीय वर्तुळात सुरेश धस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ज्याप्रकारे सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला धारेवर धरलं होत. त्याचप्रकारे आता म्हणजे धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेश धस यांना धारेवर धरलं जातंय. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असल्याने आता आमदार सुरेश धस यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय.
हेही वाचा: लव्ह जिहाद; प्रेयसीचा खून करून मृतदेह पुरला घरात
काय म्हणाले सुरेश धस?
धनंजय मुंडे यांची मी घेतलेली भेट आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मी जेवणासाठी गेलो ती भेट या दोन्ही एकत्र सांगण्यात आल्या आहेत. कुणीतरी व्यवस्थितपणे षडयंत्र रचत आहे. हे षडयंत्र मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे, असं सुरेश धस म्हणाले. ज्यांनी षडयंत्र रचले आहे, त्यांचा मी बंदोबस्त करणार असल्याचंही धस यांनी स्पष्ट केलं आहे.
'धनंजय मुंडे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटायला पाहिजे होते. पंकजा मुंडे यांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला हवी होती. मात्र, दोघेही भेटले नाहीत. या गोष्टीवर चर्चा झालेली नाही. बावनकुळे यांनी आमची भेट झाल्याचं सांगितलं. त्यावर चर्चा झाली. 'धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे नागरीक माझ्यासोबत आहेत. जरांगे पाटील यांची सुद्धा भूमिका माझ्यासोबत राहील. मी आजही ठाम आहे, उद्याही आणि जोपर्यंत आरोपींना फाशी होणार नाही, तोपर्यंत ठाम राहणार. तसेच शेवटपर्यंत लढा देणार' असल्याचं धस यांनी सांगितलं.