महाराष्ट्र: कोकणात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं असल्याचं पाहायला मिळतंय. कोकणात ठाकरे गटातील अनेक नेते मंडळी शिवसेनेत प्रवेश करताय. यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी चांगलीच वाढलीय. त्यातच आता रत्नागिरीतील नगर पंचायतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडली आहे. पंचायतीमधील पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या पाचही नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला होता. आता विकासकामांसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यामुळे उद्धव ठाकरेंची मोठी डोकेदुखी वाढलीय.
हेही वाचा: Shivsena : शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार
कोण-कोण करणार शिवसेनेत प्रवेश:
विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर या पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करुन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज जिल्हा प्रशासनाला पत्र दिलं असून कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली आहे. तर राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हे पाच नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
याआधीही कोकणात ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. आणि त्यातच आता विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर या पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करुन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाची डोकेदुखी चांगलीच वाढलीय.