Thursday, September 04, 2025 04:56:46 AM

'लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल'

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु दरमहा पात्र महिलांना 2100 देण्यात येईल असं महायुती सरकारकडून सांगण्यात आलं होत.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल

महाराष्ट्र: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु दरमहा पात्र महिलांना 2100 देण्यात येईल असं महायुती सरकारकडून सांगण्यात आलं होत. परंतु अद्यापही महिला या वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहे. यातच आता महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी वक्तव्य केलंय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या आहेत. 

हेही वाचा: खोक्याच्या समर्थनार्थ पारधी समाजाचं आंदोलन

लाडकी बहीण योजना चालूच ठेवणार असून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, आम्ही  2100 रुपये देण्याचं वचन दिलंय. त्यामुळे आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेणार नाही  असंही महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय. 

यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील ताशेरे ओढकल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवाती पासूनच विरोधकांच्या नजरेत खुपतेय. योजना सुरु झाल्या पासून विरोधकांनी कधीही प्रशंसा केली नाही, विरोधक त्यांच्या मनातील नैराश्य या योजनेवर काढताय. असा शब्दात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढलेत. 


सम्बन्धित सामग्री