Sunday, August 31, 2025 05:29:44 PM

दु:खद घटना! पंढरपूरमधील चंद्रभागा नदीत 3 महिलांचा बुडून मृत्यू

या घटनेत दोन महिलांचे मृतदेह सापडले असून तिसऱ्या महिलेचा शोध अद्याप सुरू आहे. मृत महिलांची ओळख संगीता संजू सपकाळ (वय 42) आणि सुनीता महादू सपकाळ (वय 38) अशी झाली आहे.

दुखद घटना पंढरपूरमधील चंद्रभागा नदीत 3 महिलांचा बुडून मृत्यू
3 women drown in Chandrabhaga river प्रतिकात्मक प्रतिमा

पंढरपूर: पंढरपूरमधील चंद्रभागा नदीत शनिवारी सकाळी अंघोळीसाठी उतरलेल्या जालना जिल्ह्यातील तीन महिला दुर्दैवीपणे बुडाल्या. या घटनेत दोन महिलांचे मृतदेह सापडले असून तिसऱ्या महिलेचा शोध अद्याप सुरू आहे. मृत महिलांची ओळख संगीता संजू सपकाळ (वय 42) आणि सुनीता महादू सपकाळ (वय 38) अशी झाली आहे. दोघीही जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील रहिवासी होत्या. तिसऱ्या महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरवर्षीप्रमाणे, महाराष्ट्र व अन्य राज्यांतील हजारो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात. दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्याची परंपरा आहे. शनिवारी सकाळी धावडा गावातून आलेल्या महिला नदीकाठी अंघोळ करण्यासाठी गेल्या. परंतु, पाण्याची खोली न समजल्याने तिन्ही महिला खोल पाण्यात बुडाल्या.

हेही वाचा - इस्लामपूरचं नाव बदलणार! आता 'या' नावाने ओळखलं जाणार शहर

शोधकार्य सुरू - 

स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथकाने सुनीता व संगीता यांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. तिसऱ्या महिलेसाठी शोध अद्याप सुरू आहेत. एनडीआरएफ किंवा स्थानिक पथक मदतीसाठी परिसरात सज्ज करण्यात आले आहेत.

हेही वाचा 'अर्धी दाढी राहिली नशीब समजा, नाहीतर...'; उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका

या दुर्दैवी घटनेची नोंद पंढरपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी असून प्रशासनाने नदीकाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.


सम्बन्धित सामग्री