Wednesday, August 20, 2025 09:20:31 AM

करून करून भागले, आता देवपूजेला लागले?; विजय वडेट्टीवारांनी साधला योगेश कदमांवर निशाणा

गेल्या काही दिवसांपासून मंत्री योगेश कदमांवर विविध आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशातच, शुक्रवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मंत्री योगेश कदमांवर निशाणा साधला आहे.

करून करून भागले आता देवपूजेला लागले विजय वडेट्टीवारांनी साधला योगेश कदमांवर निशाणा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मंत्री योगेश कदमांवर विविध आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशातच, शुक्रवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मंत्री योगेश कदमांवर निशाणा साधला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, 'करून करून भागले, आता देवपूजेला लागले? राज्याचे गृहराज्यमंत्री आईच्या नावावर डान्स बार चालवतात, हे उघड झाल्यावर नाही म्हणतात आणि हळूच डान्स बारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत करतात'. 

हेही वाचा: 71st National Film Awards: 'श्यामची आई' ठरला सर्वोकृष्ट; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीचा झेंडा फडकावला

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

'करून करून भागले, आता देवपूजेला लागले? राज्याचे गृहराज्यमंत्री आईच्या नावावर डान्स बार चालवतात, हे उघड झाल्यावर नाही म्हणतात आणि हळूच डान्स बारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत करतात. अशा गृहराज्यमंत्र्यांकडून कायदा व सुव्यवस्था काय राखली जाईल, जे स्वतःचं कायदा, सुव्यवस्था पाळत नाही. डान्सबार व्यवसाय करणाऱ्यांवर यांचा काय धाक राहणार? या गृहराज्यमंत्र्यांने लायसेन्स रद्द केले म्हणजे क्लिनचीट मिळाली? मंत्रीपदावर राहून त्यांनी पदाचा अपमान केला आहे त्यामुळे गृहराज्यमंत्री कदम यांचा राजीनामा झालाच पाहिजे', असं म्हणत वडेट्टीवार यांनी योगेश कदमांवर निशाणा साधला.

jai maharashtra news

हेही वाचा: 'महादेवी' हत्तीण नांंदणीत परतणार का? वनताराकडून हालचालींना वेग

अनिल परबांनी केले योगेश कदमांवर आरोप

22 जुलै रोजी, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. परब म्हणाले की, 'योगेश कदम यांचे कार्यकर्ते वाळू चोरीमध्ये सहभागी आहेत'. पुढे, अनिल परब यांनी खळबळजनक दवा केला की, 'योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. मुली ताब्यात घेतल्या. हा डान्सबार आहे'. परबांनी केलेल्या आरोपांनंतर, मंगळवारी योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन परब यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा: नांदेडमधील शासकीय रुग्णालयात हलगर्जीपणा; रुग्णांच्या अंगावर फिरतात उंदीर

काय म्हणाले योगेश कदम?

अनिल परब यांनी केलेल्या आरोपांवर गृहराज्य मंत्री योगेश कदम म्हणाले की, 'अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अनिल परब यांनी नियम मोडून माझ्यावर आरोप केले. परबांनी आपल्या अकलेचे तारे तोडले,  त्यांनी वाळू चोरीचा आरोप केला. अनिल परबांविरोधात मी हक्कभंग आणणार आहे, अनिल परबांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. माझ्या आईचा काहीही संबंध नसताना आरोप करण्यात आले, कोणत्याही प्रकरणाशी माझा संबंध असला तरी मी राजीनामा देईल, चुकीचे आरोप करून माझ्या आईला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे, अनिल परबांना माफी मागावीच लागेल'. 

पुढे कदम म्हणाले की, 'मी वाळू विकली, वाळू विक्रेत्यांना माझा आश्रय आहे, असे आरोप परब यांनी केले.  मंडनगडच्या महादेव नाल येथे पाणी साचत होते. तेथील गाळ काढला पाहिजे अशी मागणी मी केली होती. नियमानुसार त्याला परवानगी होती. ही परवानगी मिळाल्यानंतर न्यायालयाच्या नियमानुसार मी रॉयल्टी भरली होती. मे महिन्यात गाळाचा उपसा झाला, खेडमध्ये जगबुडी नदीचं पाणी शिरतं, तेथील गाळ काढला जावा अशी नागरिकांची मागणी होती, जगबुडी नदीत गाळ आहे. वाळू नाही. घरकुलाचा आणि जगबुडी नदीच्या वाळूचा काडीमात्र संबध नाही. यासह, गाळ काढून नेण्याची जबाबदारी 24 शेतकऱ्यांना नियमाने दिली होती. हा गाळ विकला जात नाही, कोणी तो घेत नाही'. 


सम्बन्धित सामग्री