Wednesday, August 20, 2025 04:35:10 AM

Vijay Wadettiwar Mother Death: कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्रींचे निधन; राजकीय क्षेत्रात हळहळ

कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार (वय: 94) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही काळापासून त्या आजारी होत्या.

vijay wadettiwar mother death कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्रींचे निधन राजकीय क्षेत्रात हळहळ

हितेश मेश्राम. प्रतिनिधी. नागपूर: कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:12 मिनिटांनी विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार (वय: 94) यांचे राहत्याघरी कमलाई निवास रामदासपेठ नागपूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. विजय वडेट्टीवार यांच्या राजकारणातल्या वाटचालीत त्यांच्या मातोश्रींचे मोठे योगदान आहे. 

हेही वाचा: Rahul Gandhi's Voter Adhikar Yatra Updates : राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेचा किती होणार फायदा ? कशी असणार प्रवासाची दिशा ? जाणून घ्या

त्यांच्या निधनामुळे, वडेट्टीवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी दुपारी 3:00 वाजता त्यांच्या राहत्या घरातून कमलाबाई यांचे पार्थिव मोक्षधाम घाटरोड येथे नेण्यात येईल आणि अंत्यसंस्कार दुपारी 3.30 मिनिटांनी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी ही अपत्य आहेत.


सम्बन्धित सामग्री