Wednesday, August 20, 2025 07:37:29 AM

Navi Mumbai Water Cut: नागरिकांनो पाणी जपून वापरा; 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद

नवी मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी 10:00 वाजल्यापासून ते शनिवार पहाटे 4:00 वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा 18 तासांसाठी बंद राहणार आहे.

navi mumbai water cut नागरिकांनो पाणी जपून वापरा 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद

कविता लोखंडे. प्रतिनिधी. नवी मुंबई: नवी मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मोरबे धरणाच्या जुन्या जलवाहिनी आणि नवीन जलवाहिनीला जोडण्यासाठी, शुक्रवारी सकाळी 10:00 वाजल्यापासून ते शनिवार पहाटे 4:00 वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा 18 तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे, नवी मुंबई महानगरपालिकाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन रहिवाशांना दिले आहे. 

हेही वाचा: राज ठाकरे मीरा-भाईंदर दौऱ्यावर; मनसेकडून टीझर लाँच

गेल्या काही दिवसांपासून पामबीच मार्गालगत असलेल्या नेरुळ सेक्टर-46, अक्षर बिल्डींगजवळील जलवाहिनीत सतत गळती होत आहे. त्यामुळे, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, खारघर आणि कामोठे नोड येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नवी मुंबई मनपाकडून करण्यात येत आहे. 


सम्बन्धित सामग्री