हिंगोली : हिंगोलीतील वसमतमध्ये दोन वर्षांपासून जलजीवन योजनेचं काम रखडलं आहे. त्यामुळे भरउन्हाळ्यात पाण्याची चिंता वाढली आहे. कंत्राटदाराच्या कामाबद्दल अनास्था निर्माण झाली आहे. योजनेचे तीनतेरा वाजल्याने उन्हाळ्यात पाण्याची अडचण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कवठा येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम दोन वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे भर उन्हात गोरगरिबांना पाण्यासासाठी वणवण करावी लागत आहे. गोरगरीबांनी पाणी आणावे तरी कुठून गावात पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याच्या टाकीचे अर्धवट काम आहे. तर जलजीवन अंतर्गत तीन विहिरी बांधल्या आहेत. करोडो रुपयाचा निधी येऊनही नळाला पाणी येत नसल्याने योजनेचे तीन तेरा झाल्याचे दिसत आहेत.
हेही वाचा : पन्हाळा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यास पन्हाळावासियांचा विरोध
विशेष म्हणजे याच गावांमध्ये एक दिवस गावकऱ्यांसोबत हा दरबार देखील संपन्न झाला. दरम्यान सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचाच उपस्थित झाला होता आणि तो तात्काळ करुन देतो असेदेखील अधिकारी म्हणाले. परंतु ते फक्त बोलण्यासाठी असतं काम करायसाठी नसतं असा प्रश्न आजच्या घडीला दिसत आहे. गावात घरावरुन जाणाऱ्या पाईपांची चाळणी झाल्याचे दिसत आहे. प्रत्येक जण पाणी विकत घेत आहे पण गोरगरिबांना ते परवडत नाही. त्यामुळे त्यांना उन्हातान्हात गावाच्या बाहेर असलेल्या विहिरीतून पाणी आणावं लागत आहे. मग सरकारने करोडो रुपयांच्या योजनेसाठी आणलेल्या निधीच झालं काय? भर उन्हाळ्यात पाणी मिळत नसेल तर या योजना आणायच्या कशाला असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.