Thursday, August 21, 2025 02:06:13 AM

यवत कसं पेटलं?, यवतमधील परिस्थितीवर काय म्हणाले फडणवीस?

पुण्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला. समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला. सध्या दौंडमधील तणाव मावळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

यवत कसं पेटलं यवतमधील परिस्थितीवर काय म्हणाले फडणवीस

पुणे: पुण्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला. समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला. सध्या दौंडमधील तणाव मावळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमधील घटनेची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. 

'यवतमधील परिस्थिती नियंत्रणात'
एका तरुणाकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. या पोस्टनंतर यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे. यवतमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. यवतमधील घटनेची चौकशी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी नागरिकांना केले आहे. 

हेही वाचा: Anjali Damania Exclusive: अंजली दमानियांचे 'जय महाराष्ट्र'वर मोठे गोप्यस्फोट

'पोस्ट करणारा नांदेडमधून काही वर्षांपूर्वी आला'
उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमध्ये दाखल झाले होते. त्यांनी यवतमधील परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. तसेच यवतमध्ये 48 तासांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोस्ट करणारा नांदेडमधून काही वर्षांपूर्वी आला. पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचा स्थानिकांशी काहीही संबंध नाही. 30-40 जणांच्या जमावाकडून यवतमध्ये तोडफोड करण्यात आली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असे त्यांनी म्हटले. 

यवतमध्ये नेमकं काय घडलं? 
26 जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरात पुतळ्याची विटंबना करण्यात आली. पुतळ्याच्या विटंबनेनंतर तणावाचं वातावरण निर्माण झाले. प्रकरण ताजं असताना तरुणाकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमध्ये तणाव वाढला. जमावाकडून तरुणाच्या घराची तोडफोड केली गेली. यामुळे दोन गटांत तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. 

गुरुवारी यवतमध्ये गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची हिंदू जन आक्रोश सभा घेतली होती. या भाषणात त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याची अपमान सहन करणार नाही. एका व्यक्तीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दगडाने तोडफोड करतोय, लाथा बुक्क्यांनी मारहाण करतोय. हे महाराष्ट्र सहन करणार नाही असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. तसेच शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याचे हात कलम करा. हा फक्त शिवरायांच्या पुतळ्यावर नाही तर समस्त हिंदूंवर केलेला आघात आहे असेही त्यांनी सांगितले आहे.  


सम्बन्धित सामग्री