महाराष्ट्र: महायुती सरकारची लाडकी बहीण ही प्रसिद्ध योजना ठरली. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा महिलांना मोठा फायदा देखील झाला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आल्याचं देखील महायुती सरकारकडून सांगण्यात आलं होत. परंतु अद्यापही या लाडक्या बहिणी 2100 रुपयांच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित यांनी या लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिलीय.
हेही वाचा: धाराशिवमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
काय म्हणाले अजित पवार?
लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याच आम्ही नाही म्हटलं नाही, आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू, सर्व सोंग करता येतात, मात्र पैशांचे सोंग करता येत नाही. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी कर्ज माफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान ऑनलाईन लॉटरी संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करू, दोन्ही बाजूंच्या सदस्यांचा समावेश यामध्ये असेल. अधिवेशन संपायच्या आत मध्ये ही समिती गठीत करण्यात येईल. धान उत्पादक शेतकरी यांना प्रती हेक्टर 20 हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचा निर्णय मागच्या कॅबिनेटला घेण्यात आला आहे. शासन निर्णय निघाल्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं.