Sunday, August 31, 2025 05:26:46 PM

Ladki Bahin Yojana August 2025 Installment: लाडक्या बहिणींना कधी मिळणार ऑगस्ट महिन्यातील हप्ता? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, ऑगस्ट महिना संपत आला असूनही लाभार्थी महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

ladki bahin yojana august 2025 installment लाडक्या बहिणींना कधी मिळणार ऑगस्ट महिन्यातील हप्ता जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana August 2025 Installment: राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी सुरु असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा ऑगस्ट 2025 चा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, ऑगस्ट महिना संपत आला असूनही लाभार्थी महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. तथापी, पैसे जमा न झाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिनेचा हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, महिन्याच्या अखेरीस निधी जमा होण्याची शक्यता आहे. तथापि, जर तो सप्टेंबरमध्ये ढकलला गेला तर लाभार्थ्यांना पुढील महिन्यात दोन हप्ते एकत्र मिळण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा - Maharashtra Rain Update : पुढील 24 तास धोक्याचे ! हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या

गेल्या काही महिन्यांत ही योजना सुरळीतपणे राबवली गेली असून, लाभार्थ्यांच्या खात्यात वेळेवर रक्कम जमा होत आहे. यामुळे महिलांमध्ये या योजनेबद्दल विश्वास निर्माण झाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यातील विलंबामुळे गोंधळ वाढला आहे. अनेक महिलांचा प्रश्न आहे की, जर या महिन्यात हप्ता आला नाही तर सप्टेंबरमध्ये दुहेरी हप्ता दिला जाईल का? या विषयावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मंत्रालयाकडूनही कोणतेही औपचारिक अपडेट जाहीर झालेले नाही. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

हेही वाचा - Python Electrocuted In Powai: पवई आयआयटी मार्केटजवळ 9 फूट अजगराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दरम्यान, रक्कम जमा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे लाभार्थ्यांच्या मोबाईलवर संदेश (SMS) येतो. तरीही खात्रीसाठी महिलांनी आपल्या बँक खात्याची नियमित तपासणी करावी. तसेच बँकेच्या अधिकृत अॅप किंवा पासबुकमध्ये व्यवहार पाहून देखील खात्यात रक्कम जमा झाली आहे का? हे तपासता येईल. एकूणचं लाडकी बहिन योजनेचा ऑगस्ट 2025 चा हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता असून, सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच लाभार्थी महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. 


सम्बन्धित सामग्री