Sunday, August 31, 2025 11:45:03 AM

Vishal Dadlani : 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'

सद्या कुंभमेळा सुरूय. यामुळे सर्वच जण कुंभमेळ्यात शाही स्नान करण्यासाठी जाताय. अशातच आता बॉलिवूडचा संगीतकार विशाल ददलानी याने थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन केलंय.

vishal dadlani  हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा

सद्या कुंभमेळा सुरूय. यामुळे सर्वच जण कुंभमेळ्यात शाही स्नान करण्यासाठी जाताय. अशातच आता बॉलिवूडचा संगीतकार विशाल ददलानी याने थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन केलंय. प्रयागराज येथे कोट्यवधी लोक शाही स्नान करण्यासाठी जाताय. गंगा नदी पात्रात शाही स्नान केल्याने केलेली सर्व पाप धुतली जातात असं म्हणतात. यामुळे मोठे संख्येने लोक प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी दाखल होऊन शाही स्नान करताय. परंतु याच संदर्भात आता धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या महाकुंभादरम्यान यमुना आणि गंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याचं पाहायला मिळतंय. गंगा आणि यमुना नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात विष्ठेत असणारे जिवाणू आढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या विषाणूस एफची असे म्हटले जाते. 

हेही वाचा: सोन्याच्या दरात मोठी घसरण! विक्रमी वाढीनंतर किंमती घसरल्या, जाणून घ्या आजचा नवा दर

त्यातच आता बॉलिवूडचा संगीतकार विशाल ददलानी याने थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन केलंय. 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा' असे आवाहन बॉलिवूडचा संगीतकार विशाल ददलानी याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरूय. 

काय म्हणाला विशाल ददलानी? 

महाकुंभाच्या त्रिवेणी संगमात पाण्यात हानिकारक जीवाणू असल्याचं वृत्त समोर आलं त्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते नाकारलं. आता त्याच बातमीचा स्क्रीनशॉट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत विशाल ददलानीनं लिहिलंय की, "सर, द्वेष करणाऱ्यांची काळजी करू नका. आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, कृपया कॅमेऱ्यासमोर जाऊन नदीच्या पाण्याचा एक घोट घ्या." विशालच्या या आवाहनाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून गंगा आणि यमुनेच्या पाण्याच्या या धक्कादायक वृत्तामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण दिसून येतंय. 


सम्बन्धित सामग्री