महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काहींना काही चर्चा रंगत असतात. त्यातच जयंत पाटील शरद पवार गटाला सोडचिट्ठी देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात. शरद पवार गटाचे नेतेआणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझं काही खरं नाही, असं वक्तव्य केल्याने त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाण आलंय. राजकीय वर्तुळातही तशा चर्चा रंगू लागल्यात.
हेही वाचा :शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची हत्या
काय म्हणाले जयंत पाटील?
माझी गॅरंटी घेऊ नका,माझं काही खरं नाही. तुम्हाला माझ्याबाबत शंका असल्यानं हमी देणं धोक्याचं आहे. राजू शेट्टींना आघाडीकडून उभं राहा असं त्यांना सांगत होतो. पण माझ्याबद्दल शंका होती, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.त्याचबरोबर शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनी जयंत पाटील लवकरच राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या गटात प्रवेश करतील असा दावा केलाय. त्यामुळे शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी केलेला दावा खरा ठरतोय की काय हे पाहून महत्वाचं ठरणारे.
जयंत पाटील यांची राजकीय कारकीर्द:
जयंत राजाराम पाटील (फेब्रुवारी 16, इ.स. 1962 - ) हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवारचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. आता ते शरद पवार यांच्या गटात असून ते लवकरच राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे.